शिवाजी महाराज घोषणा | शिवाजी महाराज घोषवाक्य
🚩आस्ते कदम, आस्ते कदम, आस्ते कदम🚩
महाराsssssज
गडपती
गजअश्वपती
भूपती
प्रजापती
सुवर्णरत्नश्रीपती
अष्टवधानजागृत
अष्टप्रधानवेष्टित
न्यायालंकारमंडित
शस्त्रास्त्रशास्त्रपारंगत
राजनितिधुरंधर
प्रौढप्रतापपुरंदर
क्षत्रियकुलावतंस
सिंहासनाधिश्वर
महाराजाधिराज
🚩राजाशिवछत्रपती महाराजांचा विजय असो.🚩
छत्रपती शिवाजी महाराज गारद आणि त्यातील प्रत्येक शब्दाचा अर्थ आज आपण समजावू घेऊयात
गडपती – गडकोटांचे अधिपती, राज्यातील गडकोटांवर ज्यांचे आधिपत्य (राज्य) आहे असा राजा.
गजअश्वपती – ज्यांच्याकडे स्वतःच्या मालकीचे हत्ती व घोडदळ आहे असे महाराज. (त्याकाळी हत्ती हे वैभवाचं प्रतिक समजलं जायचं. म्हणुन गजअश्वपती हा शब्द आपण वैभवसंपन्नतेचे प्रतीक होते असे म्हणता येईल)
भूपती प्रजापती – वास्तविक राज्याभिषेक म्हणजे राज्यकर्त्याचा भुमीशी झालेला विवाह आहे. म्हणजेच ज्यांनी राज्यातील भुमीचे व प्रजेचा पती हे पद स्विकारले आहे आणि त्यांचे सर्वथा रक्षण करणे आणि पालन हे ज्या राज्यकर्त्यांचे प्रथम कर्तव्य आहे असे महाराज.
सुवर्णरत्नश्रीपती – राज्याच्या खजिन्यातील वेगवेगळे हिरे, माणिक, मोती आणि सुवर्ण (सोने) यावर ज्यांचे आधिपत्य (मालकी) आहे असे महाराज. (शिवराय हे ३२ मण सुवर्णसिंहासनाचे अधिपती होते)
अष्टावधानजागृत – आठही प्रहर जागृत राहुन राज्याच्या आठही दिशांवर लक्ष असणारे महाराज.
अष्टप्रधानवेष्टीत – ज्यांच्या पदरी प्रत्येक शास्त्रात निपुण असलेले आठ प्रधान आहेत आणि राज्यकारभारात जे त्यांचा सल्ला घेणात असे महाराज. शिवरायांनी राज्य हाकण्यासाठी अष्टप्रधान मंडळ स्थापन केले होते.
न्यायालंकारमंडीत – कर्तव्यकठोर आणि न्यायकठोर राहुन सत्याच्या बाजुने व न्यायाच्या बाजुने निकाल देणारे महाराज.
शस्त्रास्त्रशास्त्रपारंगत – सर्व प्रकारच्या शस्त्रविद्या व शास्त्रात पारंगत (निपुण) असलेले महाराज. महाराज शस्त्राविद्या पारंगत होतेच त्याबरोबर राजांनी शास्त्र सुद्धा पारंगत केले होते.
राजनितीधुरंधर – आदर्श राज्यकर्त्याप्रमाणे राजकारणाच्या डावपेचांमध्ये (राजनितीमध्ये) तरबेज असलेले महाराज. खऱ्या अर्थाने महाराज राजनीनीधुरंदर होतेच, गनिमी कावा वापरून शत्रूला ठरवण्यात महाराज पटाईत होते.
प्रौढप्रतापपुरंदर – मोठे शौर्य गाजवुन ज्यांनी आपल्या पराक्रमाचा ठसा उमटवला असे महाराज. महाराजांनी अनेक लढाया जिंकत स्वराज्य प्रस्थापित केले होते.
क्षत्रियकुलावतंस – क्षत्रिय कुळात जन्म घेऊन त्या कुळातील सर्वात मोठा (अवतंस) पराक्रम गाजवलेले महाराज.
सिंहासनाधिश्वर – जसा देव्हाऱ्यातील देव (अधिश्वर) असतो तसेच ३२ मण सुवर्णसिंहासनावर शोभुन दिसणारे सिंहासनाचे अधिश्वर असे महाराज. राजांनी राज्याभिषेक साठी ३२ मण सिंहासन बनवून घेतले होते.
महाराजाधिराज – विद्यमान सर्व राजांमध्ये जो सर्वात मोठा आहे आणि साऱ्या राजांनी ज्यांच्या अधिपत्याखाली राहण्याचे स्विकारायला हवे असे महाराज.
राजाशिवछत्रपती – ज्यांच्यावर सुवर्णाची छत्रचामरे ढळत आहेत किंवा प्रजेने छत्र धरुन ज्यांना आपला अधिपती म्हणुन स्विकारले आहे किंवा ज्यांच्यावर प्रत्यक्षात नभानेच छत्र धरले आहे असे छत्रपती शिवाजी महाराज.
शिवाजी महाराज घोषणा ला शिवाजी महाराज गारद असे म्हणतात. या प्रत्येक शब्दाचा अर्थ आपण समजून घेतला आहे.
प्रत्येकाला हा अर्थ समजण्यासाठी हा लेख शेअर करायला विसरू नका.
छत्रपती शिवाजी महाराजांची शिवगर्जना म्हणजे त्यांचे पराक्रमी विचार, युद्धातील जोशपूर्ण घोषणा आणि स्वराज्यासाठी दिलेले स्फूर्तिदायक संदेश. त्यांच्या सिंहगर्जनेने मावळे स्फूर्तिदायक होत आणि शत्रू भयभीत होत.
शिवाजी महाराजांची प्रसिद्ध शिवगर्जना:
✅ “हर हर महादेव!” – हे युद्धघोष असायचं, जे मावळ्यांना प्रचंड ऊर्जा आणि प्रेरणा देत असे.
✅ “स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे, आणि तो मी मिळवणारच!” – महाराजांचे हे उद्गार संपूर्ण हिंदवी स्वराज्यासाठी प्रेरणादायी ठरले.
✅ “ही तलवार धर्मासाठी, ही तलवार स्वराज्यासाठी!” – त्यांच्या युद्धनीतीचे आणि ध्येयाचे प्रतीक.
✅ “शत्रूशी लढा, पण स्त्रियांवर कधीही हात टाकू नका!” – महाराजांच्या नीतिमत्तेचे प्रतीक.
✅ “आम्ही सत्तेसाठी नाही, तर लोकांच्या भल्यासाठी राज्य करतो!” – हे महाराजांच्या लोककल्याणकारी विचारांचे प्रतीक आहे.
छत्रपती शिवाजी महाराज यांचे हे विचार आजही लाखो लोकांना प्रेरणा देतात. 🚩 जय भवानी, जय शिवाजी! 🚩
शिवाजी महाराजांच्या राजमुद्रेवरील लेखन:
शिवाजी महाराजांची राजमुद्रा संस्कृतमध्ये होती आणि ती अत्यंत प्रेरणादायी होती—
🔹 राजमुद्रेचा मजकूर:
“प्रतिपच्चंद्रलेखेव वर्धिष्णुर्विश्ववंदिता।
शाहसूनोः शिवस्यैषा मुद्रा भद्राय राजते॥”
🔹 अर्थ:
“प्रथम उमलणाऱ्या चंद्रकोरीप्रमाणे ही शिवाजी महाराजांची राजमुद्रा दिनोदिन वाढत जाईल, संपूर्ण जग तिचा गौरव करेल आणि ती प्रजेसाठी कल्याणकारक ठरेल.”
छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक:
🔹 तारीख: ६ जून १६७४
🔹 स्थान: रायगड किल्ला
🔹 मुहूर्त: ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी, शनिवार
🔹 राज्याभिषेककर्ता: पंडित गागाभट्ट (काशी येथील विद्वान)
🔹 राज्याभिषेकानंतरचा किताब: “छत्रपती”
राज्याभिषेकानंतर छत्रपती शिवाजी महाराज हे हिंदवी स्वराज्याचे अधिकृत शासक झाले.
शिवाजी महाराजांचे पुत्र:
शिवाजी महाराजांना दोन पुत्र होते—
- संभाजी महाराज (१६५७ – १६८९) – ते शिवाजी महाराजांचे थोरले पुत्र होते आणि त्यांच्या पश्चात स्वराज्याचे शासक बनले.
- राजाराम महाराज (१६७० – १७००) – ते नंतर मराठा साम्राज्याचे दुसरे छत्रपती झाले.
🚩 जय भवानी! जय शिवाजी! 🚩
आम्ही आशा करतो की हा लेख तुमच्यासाठी उपयुक्त ठरेल आणि तुमच्या तयारीला नवीन उंचीवर पोहोचवेल. नवीनतम माहितीसाठी आमच्या वेबसाइटला नियमितपणे भेट द्या, कारण तुमची यशस्वी वाटचाल हीच आमची प्रेरणा आहे.